यावल महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ साजरा करण्यात आला.

यानिमित्त कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील व प्रा संजय पाटील यांच्या हस्ते डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अपर्ण पूजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा.एम. डी. खैरनार यांनी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या व्यक्तित्वावर व त्यांच्या कार्याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन संतोष ठाकूर यांनी केला. सदर प्रसंगी डॉ. एस. पी. कापडे, डॉ. आर. डी. पवार, डॉ पी. व्ही. पावरा, मुकेश येवले, मिलिंद बोरघडे, अनिल पाटील, प्रमोद भोईटे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Protected Content