युवा सेनेतर्फे सामुहिक गुणदानासाठी विद्यापीठात आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  इतर विद्यापीठ प्रमाणे २०२१-२०२२ मध्ये शिक्षण घेणारे सर्व पदवीच्या विद्यार्थीनींना सामुहिक गुणदान मिळावे  किंवा सरसकट गुण देऊन पास करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी  युवसेनेतर्फे कुलगुरू व्हि. एल. महेश्वरी यांना निवेदन देण्यात आले यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या  उन्हाळी सत्र परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. या सत्रात  प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रकारे त्रुटी आढळून आल्या, प्रश्नपत्रिकेच्या छपाईमध्ये घोळ, तसेच सहाव्या सत्रा चे प्रश्न येणे ऐवजी पाचव्या सत्र चे पश्न आले.  अशा अनेक त्रुटींबाबत आम्ही सर्व विद्यार्थीनीं आधी युवा सेनेमार्फत निवेदन दिले होते. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून याचे कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे आज युवा सेनेतर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी  विद्यार्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने त्यांच्या सर्व मागण्यांवर सोमवार दि. १५ ऑगस्टपर्यंत  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वसन देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, युवा सेनेचे उप जिल्हा अधिकारी पियुष गांधी यांनी १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यासं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला.

या आंदोलनात पियुष गांधी,  अभिजित रंधे, अमोल मोरे,  अक्षय गावंडे, रितेश कोळी, सोमनाथ पाटील, जगदीश पाटील, अल्ताफ आरिफ पिंजारी, आयुष कराडे, प्रशांत पाटील, दीपक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

मागण्या खालील प्रमाणे –  इतर विद्यापीठ प्रमाणे २०२१-२०२२ मध्ये शिक्षण घेणारे सर्व पदवीच्या विद्यार्थीनींना सामुहिक गुण दान (Combnine passing) मिळावे व आमचे वार्षिक नुकसान होण्यापासून वाचवावे.  किंवा सरसकट गुण देऊन पास करण्यात यावे.  ह्याच महिन्यात पुरोनि परीक्षा घेऊन लगेच ८ दिवसात निकाल लावण्यात यावा.  राहिलेले अभ्यासक्रमाचे निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे.

 

Protected Content