आमदार राजूमामा भोळे ३ ऑक्टोबरला अर्ज भरणार

rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । जळगावचे आमदार राजूमामा भोळे हे ३ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. ते आज मित्र परिवारातर्फे आयोजित स्नेह मेळाव्यात बोलत होते.

आमदार राजूमामा भोळे यांच्या मित्र परिवारातर्फे आज आदित्य लॉन येथे सायंकाळी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासह आमदार चंदूभाई पटेल तसेच पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला आमदार भोळे यांच्या विविध क्षेत्रांमधील मित्रमंडळीदेखील उपस्थित होती. याप्रसंगी आमदार चंदूभाई पटेल यांनी आमदार भोळे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर त्यांनी आपल्या भाषणातून आपण ३ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली. या दिवशी सकाळी दहा वाजता जी.एम. फाऊंडेशनच्या कार्यालयापासून भव्य मिरवणूक काढून अर्ज सादर करण्यात येणार आहे. याप्रसंगी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूभाई पटेल यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि समर्थकांची उपस्थिती असेल अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी आपल्याला पक्षाकडून तिकिटाची ग्वाही देण्यात आली असून सर्व जणांच्या आशिर्वादाने पुन्हा विजय संपादन करणार असल्याचा आशावाद आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला.

Protected Content