साहेब…होळीची सुटी द्या, अन्यथा बायको दुसऱ्या बरोबर पळून जायचं म्हणतेय !

भागलपूर (वृत्तसंस्था) माझ्या पत्नीचा फोन आला होता. यावेळी होळीच्या सणाला तुम्ही घरी यायचंय, नाही आलात तर मी दुसऱ्यासोबत पळून जाईल,असे म्हटलेय. त्यामुळे मला होळीसाठी 5 दिवसांची सुट्टी द्यावी, अन्यथा तुम्ही माझ्या बायकोला समाजावून सांगावे, अशी विनंती एका पोलीस शिपायाने आपल्या वरिष्ठांना एका अर्जातून केलीय. सध्या हा अर्ज तुफान व्हायरल होतोय.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील सीटीएस नाथनगर येथील एका प्रशिक्षक पोलीस शिपायाने सीटीएस प्रमुखांकडे अर्ज केला आहे. या अर्जात त्याने लिहिलेय की, ५ मार्च रोजी त्याला त्यांच्या पत्नीचा फोन आला होता. ‘यावेळी होळीच्या सणाला तुम्ही घरी आले नाहीत, तर तर मी दुसऱ्यासोबत पळून जाईल, पत्नीचे हे वाक्य ऐकल्यापासून मी खूप तणावात आलो आहे. त्यामुळे मला होळीसाठी ५ दिवसांची सुट्टी द्यावी, अन्यथा तुम्ही माझ्या बायकोला समाजावून सांगावे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या पोलीस शिपायाने म्हटले आहे. दरम्यान, होळीमुळे पोलीस विभागाकडून सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द केल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

Protected Content