सेंटरींग प्लेट चोरणारे अटकेत

रावेर प्रतिनिधी । येथील भाग्योदय ऑटो सेंटरच्या बांधकामावरील सेंटरींग प्लेट चोरणार्‍या दोघांनी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर येथील भाऊ ढाब्यासमोर भाग्योदय ऑटोचे बांधकाम सुरू आहे. यात नाखला भाबडा भिलाला व शे शाकिर शे समद यांनी संगनमत करून वरील सेंटरींग प्लेट चोरी करीत असता त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. या संदर्भात सदाशिव शंकर पाटील (रा. बोरखेडा, ता. रावेर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाखला भाबडा भिलाला (४० वर्ष, रा. मांडवा जिल्हा खरगोन) आणि शेख शाकिर शेख समद (४० वर्ष रा. रावेर) या दोघांविरूध्द पाण्याचेटाकी जवळ गुरन-४६/२०२० अन्वये आणि भादंवि कलम-३७९,३४ याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र सुरवाडे, तुषार मोरे, मनोज मस्के यांनी हे करत आहेत.

Protected Content