तापमानाचा पारा ४४ अंशावर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंशाच्या वरच असून सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवून येत आहे. तर वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य जीवनावर परिणाम  झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या २ महिन्यापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली असून तापमानाचा पार चढता आहे. जिल्ह्याचे तापमान किमान २९ तर कमाल ४४ ते ४५ अंशादरम्यान आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवनावर देखील मोठा परीणाम झाला आहे.

उष्माघातापासून बचाव करा- प्रशासनाचे आवाहन 

दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे हवामान विभागाने जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देखील दिला होता. सकाळपासूनच उन्हाचा तीव्रता जाणवून येत असून दुपारी १२ वाजेपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारच्या वेळी शक्यतो नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात उष्माघातामुळे दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची देखील नोंद आहे.

आगी लागण्याच्या प्रकारात वाढ
जळगाव शहरात दररोज मोकळ्या परिसरात वाळलेल्या गवताला, कचऱ्याला दुपारच्या सुमारास आगी लागण्याच्या घटनावर मनपा अग्निशमन कर्मचारी वेळीच धाव घेत त्यांचे कर्तव्य निभावतात. परंतु जिल्ह्यात शहरी भागात सर्वसामान्य नोकरदार नागरिक, महिलाच नव्हेतर ग्रामीण भागात देखील शेतकरी बहुधा कामानिनित्त आठ ते दहा वाजेपासून घराबाहेर पडतात. बऱ्याच ठिकाणी मर्यादित कुटुंबामुळे नोकरदार कामावर जाणाऱ्या नागरिकांची घरे बंदच असतात. अशा बंद घरांमध्ये देखील वाढते तापमान आणि पर्यायाने क्वचित प्रसंगी होऊन या बंद घरांमध्ये आगी लागण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग 

पाचोरा येथे दामजी नगरात दुसाने नामक जामनेर येथे शिक्षणविस्तार अधिकारी असलेले तसेच नगरदेवळा येथे केंद्रप्रमुख असलेले दाम्पत्य नोकरी निमित्ताने सकाळीच घराच्या बाहेर पडतात. बुधवारी २७ एप्रिल रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास शिक्षक दाम्पत्याच्या बंद घरातून धूर येत असल्याचे शेजारच्या नागरिकांना दिसले. शेजारच्या नागरिकांना विजेच्या मीटरजवळच शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडत असल्याचे दिसून आले. शेजारच्या नागरिकांनी वेळीच धाव घेत इले. मीटर जवळील फ्युज काढून वीजपुरवठा खंडीत केला. या घराचे कुलूप तोडून पहिले असता बैठक तसेच आतील बरेच फर्निचरसह जीवनावश्यक वस्तू संसारोपयोगी साहित्य जळून नष्ट झाले होते. सुदैवाने किचनमध्ये गॅस सिलेंडरपर्यत आग पोचण्यापूर्वीच नागरिकांनी हि आग विझविली.

Protected Content