शहर वाहतूक शाखेच्या मदतीसाठी 12 ट्राफिक वार्डनची नेमणूक

Traffice garden

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आता शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीला ट्राफिक वार्डन साठी 12 जणांची नेमणूक करण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून बेशिस्त वाहतूक करणाऱ्यांवर आळा बसणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली.

मुलांना व मुलींना बसस्टॉपबाबतची प्रशिक्षण देवून 12 जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून शहरात ट्रीपल सीट, फॅन्सी नंबर, बेशिस्त वाहतूक, अवजड वाहने, टवाळखोर मुले व वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर वचक बसणार आहे. या पथकाला शहर वाहतूक शाखेच्या वतीने योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून आज त्यांना शहरातील महत्वाचे सिग्नल चौक आणि संभव्य होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content