प.वि.पाटील विद्यालयाने प्रभातफेरीतून दर्शविली विविधतेतून एकता

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज सलाम आहे त्या वीरांना, ज्यांच्यामुळे स्वातंत्र्याचा दिवस पाहिला, ती आहे भाग्यशाली जीच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला | अशा या वीरांना स्मरण करून केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाची भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महितसवानिमित्त भव्य अशी प्रभातफेरी प्रभात कॉलोनी तसेच एम. जे. कॉलेज परिसरात काढण्यात आली.

महाराष्ट्र, पंजाब , बंगाल, चेन्नई, गुजरात अशा विविध राज्याच्या पोशाखाची वेशभूषा तसेच विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले. भारताच्या विविधतेतील एकतेचे सुंदर चित्र यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या डोळ्यासमोर उभे केले. मेरा भारत महान, भारत माता की जय, वंदे मातरम, एक दोन तीन चार भारतमातेचा जयजयकार, जयघोष स्वातंत्र्यदिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा आदी घोषवाक्यांनी परिसर दुमदुमला.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तस सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content