आर.आर. विद्यालयात कोरोना नियम पाळून विद्यार्थ्यांची हजेरी (व्हिडीओ )

 

जळगाव प्रतिनिधी । कोरोना ओसरल्यानंतर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याला परवानगी दिली आहे. शहरातील आर.आर. विद्यालयात बुधवारी १ डिसेंबर रोजी दुपारी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यामध्ये उत्साह असल्याचे प्रभारी मुख्याध्यापक परेश श्रावणी यांनी सांगितले.

प्रभारी मुख्याध्यापक परेश श्रावगी यांनी सांगितले, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिकविले जात होते. आता शासनाच्या परिपत्रकानुसार बुधवार १ डिसेंबर रोजीपासून पाचवी ते दहावी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आर.आर. विद्यालयात पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू केले आहे. दोन सत्रात शाळा सुरू करण्यात आली आहे. यात पहिल्या सकाळच्या सत्रात चार वर्ग तर दुपारच्या सत्रात वर्ग भरविण्यात आले. यावेळी सकाळ सत्रात विद्यार्थ्यांचे बँड पथकाच्या वाद्याने आणि गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षानंतर आज शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1100811723989081

Protected Content