खडसे महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान संपन्न

khadase school

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात आज (गुरुवार) रोजी महाविद्यालयातील रासेयो एककामार्फत तंबाखूमुक्त अभियान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.व्ही.आर.पाटील यांनी सांगितले की, तंबाखूमुक्त अभियानाची उपयोगिता व महाविद्यालयीन युवकांच्या जीवनात व्यसनमुक्तीचे महत्त्व उपस्थितांसमोर स्पष्ट केले. तसेच कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली, तसेच समाज देखील व्यसन मुक्त करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए. पी.पाटील, प्रा.डी.आर.कोळी (रासेयो कार्यक्रम अधिकारी), प्रा.एस.बी.साळवे (विद्यार्थी विकास अधिकारी), प्रा.सी.व्ही.ठिंगळे (रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डी.आर.कोळी यांनी केले आहे. सूत्रसंचालन प्रा.व्ही.बी.डांगे (रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) यांनी केले तर आभार प्रा.सी.व्ही.ठिंगळे यांनी मानले.

Protected Content