पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रिया पाटील यांचा सन्मान

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील इंदिराबाई ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थाी प्रिया पाटील यांची पीएसआय पदी निवड झाल्याने कॉलेजच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रिया प्रकाश पाटील व तिचे आई-वडील उपस्थित होते. पीएसआय बनण्यासाठी आपण आलेल्या अडचणींवर कशी मात केली व अभ्यासाचे नियोजन कसे केले. याबाबत प्रियाने विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. पीएसआयची तयारी करीत असताना त्यांनी B प्लॅन तयार ठेवला होता. हे आवर्जून सांगितले. कोणत्याही स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना B. प्लॅन तयार असला म्हणजे नैराश्य येत नाही. सोबतच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या शंकांचे निरसन देखील केले.

प्रसंगी ग्रामीण विकास तरुण मित्र मंडळ जामनेर पुरा संस्थेचे सचिव श्री किशोर भाऊ महाजन, तसेच ज्येष्ठ संचालक फकीरा काका धनगर , श्रीराम नाना महाजन , भगवान बेनाडे यांचे सह विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण सर , कॉलेजचे पर्यवेक्षक निमगडे सर , अत्तरदे सर , गायकवाड सर व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता महाजन मॅडम.प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एस .आर.चव्हाण सर यांनी केले,के. डी . निमगडे सर यांनी परिचय करून दिला.अध्यक्षीय भाषण संस्थेचे सचिन किशोर महाजन यांनी केले.तसेच डी.एस.महाजन यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमास कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Protected Content