जामनेरात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जामनेर प्रतिनिधी । विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर बेछुट आरोप करून पक्षाची बदनामी करत आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील नगरपालिका चौकात देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

याप्रसंगी जामनेर शहराचे शहराध्यक्ष पप्पू पाटील , जामनेर तालुक्याचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, जामनेर तालुका युवक तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील , सामाजिक न्यायाचे तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे , दीपक रिचवाल , जामनेर शहर युवक अध्यक्ष विनोद माळी, खालिद साहब, राजू नाईक ओबीसी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष इमरान गफार, संतोष झाल्टे, सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष जलील शेख, जामनेर युवक सचिव आयफाज मुल्लाजी , निखिल निकम सामाजिक न्याय शहर संघटक, प्रल्‍हाद बोरसे तालुका उपाध्यक्ष, अजहर शेख, साबीर शेख मिस्तरी, अझहर शेख, शाहिद शेख, राजू शेख यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content