Home धर्म-समाज मुक्ताईनगर येथे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिमय वातावरणात साजरी

मुक्ताईनगर येथे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिमय वातावरणात साजरी

0
1


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयात ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला भाविकांनी मोठी उपस्थिती दर्शवून जन्माष्टमीच्या आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या वेळी सेवाकेंद्र संचालिका वर्षा दीदी व सुषमा दीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे अध्यात्मिक महत्त्व आणि त्यामागील गूढ रहस्य अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. श्रीकृष्णाचे जीवन हे प्रेम, पवित्रता, शांती, निष्काम कर्म आणि उच्च सद्गुणांची प्रेरणा देणारे आहे. दैनंदिन जीवनात या मूल्यांचा स्वीकार करून मानवी जीवन अधिक सुंदर आणि तणावमुक्त कसे बनवावे, असा मोलाचा संदेश दीदींनी आपल्या व्याख्यानातून दिला.

या आध्यात्मिक सोहळ्यात लहान मुलींनी श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आणि जीवनावर आधारित नयनरम्य व सुंदर नृत्ये सादर केली. चिमुकल्यांच्या या मनमोहक सादरीकरणाने आणि नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकून घेतली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात चिमुकल्या कलाकारांना उत्स्फूर्त दाद देत त्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वाटप आणि उपस्थितांना ‘श्रीकृष्ण शुभेच्छा कार्ड’ वितरण करून करण्यात आली. संपूर्ण सोहळा आनंदी, पवित्र आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound