विर एकलव्य जयंतीनिमित्त काढली भव्‍य रॅली

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने विर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वीर एकलव्य जयंती निमित्ताने आदीवासी युवकांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली.

जामनेर तालुक्यातील पहूर येथे वीर एकलव्य जयंती निमित्त आदिवासी एकता मंच शाखेच्या फलकाचे उद्घाटन राज्याध्यक्ष एम.बी.तडवी यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी एकता परिषदचे राज्य संपर्क प्रमुख सुनील गायकवाड हे होते. तसेच विशेष अतिथी म्हणून आदिवासी तडवी भिल परिषदेचे अफसर तडवी व अलीबाबा तडवी होते.

कार्यक्रमाची सुरुवात आदिवासीचे आराध्यदैवत वीर एकलव्य व महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा विर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांनी एकत्रित येऊन रॅली काढली या रॅलीत तरुणांची मोठ्या प्रमाणात सहभाग होता . महिलांनी उत्स्फूर्त सहभागी रॅलीमध्ये नोंदवला. या कार्यक्रमाला आदिवासी एकता जिल्हाध्यक्ष सलीम तडवी, राज्य सदस्य नसीर तडवी जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज तडवी , रब्बिल तडवी, जिल्हा सचिव जहांगीर तडवी, रावेर तालुका अध्यक्ष सलीम तडवी, यावल तालुका अध्यक्ष सरदार तडवी तसेच महिला जिल्हाध्यक्ष मुन्नाताई तडवी, महिला जिल्हाउपाध्यक्ष बबिताताई तडवी, असलम तडवी, फर्दापूर सुधाकर सोनवणे ,संजु तडवी ,शकील तडवी, शेखलाल तडवी पाल येथील रमा तडवी, जुबैदा तडवी, हजरा तडवी, कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी एकता मंच चे मराठवाडा विभाग प्रमुख कदीर तडवी, सांडू तडवी , शेखचाँद तडवी, गायास तडवी ,अशरफ तडवी ,शकील तडवी यांच्यासह सर्व आदीवासी बांधवांनी आणी आदीवासी एकता मंच चे तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले केले .

Protected Content