फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवात वाहनाचा हॉर्न वाजविण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटनेत झाल्याचा आरोप फैजपूर शहरातील लक्ष्मीनगर परिसरात करण्यात आला आहे. या प्रकरणी नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह सुमारे २० जणांविरुद्ध १३ ऑक्टोबर रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मंगला रमेश मोरे यांच्या तक्रारीनुसार, २० सप्टेंबर रोजी गणपती दर्शनावरून परतताना शीतल अकॅडमीसमोर हॉर्न वाजविण्यावरून वाद झाला. त्यानंतर संबंधित ठिकाणी गेल्यावर जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दीड तोळ्याच्या दोन सोनसाखळ्या गहाळ झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात नगरसेवक सिद्धेश्वर वाघुळदे, नगरसेविका भावना भारंबे यांच्यासह अन्य व्यक्तींची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर करीत आहेत. तक्रारीतील आरोप अद्याप तपासाच्या अधीन आहेत.



