Home क्राईम विशेष गस्तीदरम्यान जळगाव वाहतूक शाखेकडून अवैध वाळू डंपर व ट्रॅक्टर जप्त!

विशेष गस्तीदरम्यान जळगाव वाहतूक शाखेकडून अवैध वाळू डंपर व ट्रॅक्टर जप्त!

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. विशेष गस्त दरम्यान शहर वाहतूक शाखा व पोलीस पथकाने कारवाई करत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा पिवळ्या रंगाचा डंपर तसेच ट्रॅक्टर जप्त करून वाळू माफियांना मोठा धक्का दिला आहे. याप्रकरणी नशिराबाद आणि धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्रीच्या वेळी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्यासह पोलीस अंमलदार मिलिंद पाटील, गणेश घुगे व शुद्धोधन ढवळे हे जळगाव जिल्ह्यात विशेष गस्तीवर होते. गस्तीदरम्यान जळगावकडून भुसावळकडे जात असताना तरसोद फाट्याजवळील पुलावर १२:१५ वाजता पिवळ्या रंगाचा सहा टायरी डंपर (क्र. WB 29 A 5591) संशयास्पदरित्या जाताना आढळून आला. पोलिसांनी डंपर थांबवून पाहणी केली असता त्यात सुमारे १०,००० रुपये किमतीची ३ ब्रास वाळू (रेती) आणि ३,००,००० रुपये किमतीचा डंपर असा एकूण मुद्येमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चालक मोहन नथ्थू धामोडे (वय २४) व मालक पवन कैलास कोळी (वय २६, दोघे रा. संभाजी नगर साकेगाव, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे २ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष गस्त दरम्यान विलास भिवा पाटील (वय ५४, रा. वैजनाथ ता. एरंडोल) याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र. MH 19 C Y 2315) द्वारे नदीकिनारी अवैध वाळू रिकामी करताना पकडण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा जळगाव व पोना शशिकांत तायडे, अमोल घुगे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, गणेश घुगे, शुद्धोधन ढवळे यांच्या पथकाने पार पाडली.


Protected Content

Play sound