शिवजयंतीनिमित्त चाळीसगावात रयत सेनेतर्फे पोवाडा

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरात रयत सेनेच्या वतीने पोवाड्याचे आयोजन करण्यात आले. या पोवाड्याला शिवशाहीर शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती लाभल्याने परिसर शिवशाहीच्या गजराने दुमदुमला.

संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरातील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयातील प्रांगणात रयत सेनेच्या वतीने काल रोजी ७ वाजताच्या सुमारास पोवाड्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवशाहीर शिवाजीराव पाटील यांनी शिवरायांचा धगधगता इतिहास मांडला. तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, डॉ. जयवंत देवरे, राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अविनाश देशमुख, भाऊसाहेब पाटील, एस. पी. ठाकरे, महेश चव्हाण, उद्योगपती राज पुंशी ,प स मा. सभापती संजय पाटील, पोलीस निरीक्षक के. के. पाटील, मा नगरसेवक नितीन पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, घृष्णेश्वर पाटील, सोमसिंग राजपूत,रोशन जाधव, सदाशिव गवळी , संगीता गवळी, अंकुर संघाच्या प्रा. डॉ. साधना निकम, ॲड राहुल जाधव, ॲड धीरज पवार, मुकुंद पाटील, धुळे येथील शिवज्ञा प्रा. अध्यक्षा अश्विनी पवार, ॲड. रवींद्र पवार, अभि. दिपक निंबाळकर, प्रा.डॉ. रवि चव्हाण, अनिल ठाकरे ,विलास गवळी, छगन जाधव, गोकुळ पाटील, खुशाल बिडे, गोरख साळुंखे, दीपक राजपूत, मनोज भोसले, नाना शिंदे , सतीश पवार, बाळासाहेब पवार ,योगेश पाटील, चेतन वाघ ,आर. बी जगताप, प्रा. चंद्रकांत ठाकरे, स्वप्निल जाधव, अरुण पाटील, मनोहर सूर्यवंशी, निलेश पाटील, सुधीर पाटील, संजय वाघ, पत्रकार एम. बी. पाटील ,रामलाल चौधरी, स्वप्निल वडनेरे ,आनंद गांगुर्डे, ,विजय पवार, सुनील पवार, दिलीप पवार, वंचित आघाडी शहराध्यक्ष सागर निकम, अमोल पवार, रवींद्र पाटील, विशाल पवार आदी उपस्थित होते. तसेच पूजन झाल्यानंतर जळगावचे आर्य महेश पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गारद दिली. शिवगर्जना आयुष गांगुर्डे यांनी दिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर शालेय विद्यार्थिनी तनिष्का पवार, सिद्धी पवार यांनी भाषण केले.

याप्रसंगी भारतीय सैन्य दलातील सैनिक आबासाहेब गरुड, गोकुळ पाटील, विकास देवरे, हवालदार संदीप चव्हाण ,सोमनाथ भामरे, सुरेश पाटील, दीपक पवार, मधुकर बोरसे, राजीव गुडेकर, यशवंत वाबळे ,निंबा महाजन , सुरेश सोनवणे, विकास पाटील आदी उपस्थित होते. यावेळी, सुनील थोरकर व सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख यांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी रयत सेनेने आज पर्यंत केलेले कार्य विषद केले. समाजाच्या न्याय व हक्कांसाठी यापुढे संघटना सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी. एन. पाटील ,पप्पू पाटील, प्रमोद वाघ, खुशाल पाटील, सचिन पवार ,ज्ञानेश्वर कोल्हे , गोकुळ पाटील, आबासाहेब गरूड, संजय कापसे , भाऊसाहेब पाटील, स्वप्निल गायकवाड ,देवेंद्र पाटील, दिनेश चव्हाण, दीपक देशमुख, प्रदीप मराठे, समाधान मांडोळे, मुकुंद पवार, भरत नवले, राजेंद्र पाटील, गौरव पाटील, सागर जाधव, विलास मराठे,विनोद राठोड,रमेश पवार, ज्ञानेश्वर सोनार, सागर चव्हाण, कुलदीप पाटील, अमोल पाटील, विकास पवार, दीपक नागणे, इस्माईल भाई ,संतोष पाटील, विजय दुबे, मंगेश देठे,प्रशांत अजबे,दिलीप अहिरे, गजानन पावले आदींनी परिश्रम घेतले. तर रयत महिला आघाडीच्या रत्ना पाटील, आशाबाई पाटील , सामाजिक कार्यकर्त्या हर्षदा पवार उपस्थित होते, सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी तर आभार सचिन पवार यांनी केले.

Protected Content