पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । आज झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे अ. भा. गुर्जरदेवसेना संघटनेतर्फे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अ. भा. गुर्जरदेवसेना संघटनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास माजी जि.प.अध्यक्ष गोरख तात्या पाटील प्रदेश अध्यक्ष डी. के. पाटील , मनोज पंडित पवार , डॉ. राधेश्यामजी चौधरी , सचिन पवार , हिरालाल व्यंकट चौधरी , चंद्रशेखर पाटील उपस्थित होते. ऍड. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुनील ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रास्तावित केले. यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अ. भा. गुर्जरदेवसेना संघटनेचे विविध पदाधिकारी पंकज पाटील, भूषण पाटील, मनोज पाटील, शाम पाटील, ऋषिकेश पाटील , राहुल पाटील, अमोल पाटील व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1042537936262448/

 

Protected Content