चाळीगावात गावठी हातभट्टीवर शहर पोलीसांची धाड

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील नागद रोडवरील झोपडपट्टीजवळ हातभट्टीवर आज चाळीसगाव शहर पोलीसांनी धाड टाकत सुमारे ६० लिटरची दारू नष्ट केली आहे. तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील झोपडपट्टी जवळील पाण्याच्या टाकीजवळ दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांना आज १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यावर शहर पोलिसांनी सदर ठिकाण गाठून ३,००० रूपये किंमतीचे तयार केलेली ६० लिटर मापाची दारू दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उध्वस्त करण्यात आली. यावेळी रोषण सत्तार सैय्यद रा. नागदरोड चाळीसगाव  आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक बिरारी, पंकज पाटील व भगवान माळी आदींनी केली आहे. पो. कॉ. अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भगवान माळी हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!