गुरुमाऊली सेवानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने रक्तदान शिबीर

 

पारोळा, प्रतिनिधी । येथून आठ किमी अंतरावर असलेल्या सांगवी दादाजी धुनिवाले दरबारात गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 25 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण देशात कोरोना महामारी संकट सुरू असल्याकारणाने आजारी असलेल्या रुग्णाला रक्ताची कमी भासू नये यासाठी गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तरी कोणाला रक्तदान करायचे असेल त्यांनी छोटू पाटील (विद्यापीठ) मो. 99 60 96 61 00, बन्सीलाल पाटील 99 70 73 51 15 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Protected Content