अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले व सोडले

रावेर प्रतिनिधी । बेकायदेशीर वाळूने भरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली शहरातील ओंकारेश्वर मंदीराजवळ महसूलच्या एका अधिकाऱ्याने पकडले आणि लगेच सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित वाहतूकदारावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेरच्या कर्तव्यदक्ष तहसिलदारांची तालुकाभरात अवैध वाळूवर धडक कारवाई करण्याची ख्याती असतांना त्यांच्याच एका अधिकाऱ्याने १७ ऑगस्ट रोज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकले.

दरम्यान, गौणखनिजाची वाहतूक करण्यास पुर्णपणे बंद असतांना वाहतूक होती कशी असा सवाल नागरिकांना पडला आहे. पकडलेले अवैध गौण खनिजचे ट्रॅक्टर सोडल्याने उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे. अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून समजली आहे. ट्रॅक्टर मालकाशी थेट मोबाईलवरुन बोलून सोडून दिल्याने अवैध वाळू चालकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Protected Content