सोनिया व राहूल यांनी चीनकडून पैसे घेतले-भाजप अध्यक्षांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली । खोट्या बातम्या पसरवण्यासाठी सोनिया व राहूल गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले असल्याचा गंभीर आरोप आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीनंतर भाजप व काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. फेसबुक व व्हॉटपअ‍ॅपसारखे सोशल मीडिया मंच हे संघ-भाजपच्या तालावर नाचत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये आता भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील उडी घेतली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियाचा गैरवापर आणि पीएम केअर्स फंडाबद्दल प्रश्‍न विचारले होते. त्यावरून नड्डा यांनी जोरदार टीका केली आहे. त्यासोबतच तुमचं सगळं करियर हे खोट्या बातम्या पसरविण्यातच गेलं असा टोलाही लगावला आहे. तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत चीनकडून पैसे घेतले. यापेक्षा खालच्या पायरीवर कोणी येऊ शकतं का? असं नड्डा यांनी म्हटलं आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत आता थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली असून याला काँग्रेस कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content