Home Cities जळगाव सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी साजरा केला तक्रारीचा वाढदिवस (व्हिडिओ)

सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी साजरा केला तक्रारीचा वाढदिवस (व्हिडिओ)

0
54


जळगाव,प्रतिनिधी | माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना महापालिका प्रशासनाने शहरातील बेसमेंटचे अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्‍वासन देऊन आज एक वर्ष झाले तरी काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याचा निषेध म्हणून गुप्ता यांनी चक्क आज आश्‍वासनाला हरताळ फासण्याचे दु:ख याचा वाढदिवस साजरा करून केले.

 

आज महापालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. हा लोकशाही दिवस केवळ नावापुरताच साजरा केला जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे. महापालिकेचे अधिकारी हे नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे अशी अपेक्षा करतात मात्र स्वतः कोणत्याही नियमांचे पालन करत नसल्याचे श्री. गुप्ता यांनी सांगितले. नागरिक वर्षानुवर्षे आपल्या तक्रारी घेऊन फिरतात परंतु, त्यांना न्याय मिळत नाही. ७ डिसेंबर २०२० रोजी लोकशाही दिनी श्री. गुप्ता यांनी लोकशाही दिनाच्या दिवसी तक्रार दिल्यानंतर शहरातील बेसमेंटचे अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात कारवाई होत नसल्याने दीपक कुमार गुप्ता यांनी आज महापालिकेत त्या अर्जाचा गांधीगिरी करत केक कापून वाढदिवस साजरा करत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/458537372333599

 


Protected Content

Play sound