महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून समाजातील गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी यासह त्यांना मदत व्हावी हे उद्दिष्ट ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच संघटनेतर्फे एक वही एक पेन संकलन उपक्रम रेल्वे स्टेशन येथे राबविण्यात येत आहे. या उपक्रमास नागरिक उत्तम प्रतिसाद देत आहेत. या उपक्रमास कॉंग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष शामकांत तायडे यांनी देखील भेट दिली देवून या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या उपक्रमासाठी चेतन नन्नवरे, प्रशांत सोनवणे, कपिल जाधव, प्रकाश दाभाडे, बबलू पेंढारकर, आकाश भालेराव, विश्वास बिऱ्हाडे, सागर सदावर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

दरम्यान याच प्रमाणे वंचित बहुजन महिला आघाडी व सिद्धार्थ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन सुजाता ठाकूर, अक्षय जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ. भरत गायकवाड, अमोल शेलार व त्यांच्या पथकाचे  सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी आप्पा साळवे, राजू सोनवणे, मयूर पेढे, सुनील भालेराव आदींनी कामकाज पहिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/423713862796709

 

Protected Content