यावल तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री; कारवाईची मागणी

यावल प्रतिनिधी । शहरातील विविध ठिकाणी व तालुक्यात दारू व गुटख्यासह अवैध धंद्यांची संख्या वाढणे ही सामान्य बाब बनली आहे. हा अवैध व्यापार रोखण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी करण्यात येत आहे. 

यावल शहरातील बोरावल गेट व गोळीबार टेकळी या परिसरात व तालुक्यातील कोरपावली, सावखेडा सिम, सांगवी, डोंगर कठोरा, भालोद, आमोदा, न्हावी, हिंगोणा, किनगाव व इतर ठीकाणी गावटी दारूची सर्रास बेकाद्याशीर विक्री करण्यात येत असुन सहज उपल्बध होणाऱ्या या घातक रसायन व्दारे तयार होत असलेल्या गावटी दारूच्या आहारी जावुन अनेक मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करणारे गोरगरीबांच्या आयुष्याची राखरांगोळी होत आहे. 

अल्पवयीन मुलदेखील मोठ्या प्रमाणावर व्यसानाधीन झाल्याचे दुदैवी चित्र दिसुन येत आहे. दरम्यान यावल शहरासह तालुक्यातील जवळपास सर्व गावामध्ये गुजरात व मध्यप्रदेश राज्यातुन चोरट्या मार्गाने आयात होणाऱ्या गुटक्याची देखील सर्वत्र सार्वजनिक ठीकाणी खुलेआम विक्री होत आहे. दरम्यान काही दिवसापुर्वी अन्न व औषद्य प्रशासन विभागाने गुप्त माहीतीच्या आधारावर फैजपुर येथे सात लाखाचा गुटक्याचा साठा जप्त केला होता. 

अशा प्रकारे तालुक्यात पानटपऱ्या पासुन किराणा दुकानांवर बिना रोकठोक विक्री होणाऱ्या गुटक्यासाठी गुप्त माहीतीची गरज काय गरज असा प्रश्न व संशय अन्न व औषद्य प्रशासन विभागाने केलेल्या कार्यवाही बाबत उपस्थित होत आहे. यावल तालुक्यात सर्वत्र खुलेआम विक्री होणाऱ्या गुटका आणी गावटी दारूची बेकाद्याशीर होणारी विक्री निष्प:क्ष व निस्वार्थपणे कारवाई करून तात्काळ प्रतिबंद करावी अशी मागणी होत आहे.

 

 

Protected Content