दोन मोटरसायकलच्या धडकेत पाच जखमी ; दोन गंभीर

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल – विरावली रस्त्यावर दोन मोटरसायकलांची समोरासमोर धडक होवून  ५ व्यक्ती जखमी झाल्या असून त्यातील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल – विरावली रस्त्यावर सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान  दोन मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात ५ पैकी २ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित दोघांना भुसावळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात सागर चंद्रकांत तायडे ( वय २५ रा. कोरपावली ता. यावल), भीमराव इंधाटे ( रा. कोरपावली ),  गणेश संजय चौधरी ( वय २२ दहीगाव ता.यावल,) मोहित संतोष पाटील (रा. विरवली ), गौरव (रा.कोरपावली पुर्ण नांव माहीत नाही) आणि दोन जण असे पाच जण या अपघातात जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जिशान खान यांनी व त्यांच्या सहकार्यानी जखमींवर प्रथमपोचार केलेत. अपघाताचे वृत्त कळताच भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, युवा मोर्चाचे परेश नाईक, भुषण फेगडे यांनी जखमींवर तात्काळ उपचारासाठी प्रयत्न केलेत.

 

Protected Content