जितेंद्र पाटील ‘समाज भूषण पुरस्कार २०२१’ने गौरन्वित

एरंडोल प्रतिनिधी | राजनंदनी बहुउद्देशीय संस्था, जळगावच्या माध्यमातून ‘आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे’ अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते ‘समाज भूषण पुरस्कार २०२१’ ने गौरविण्यात आले

रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, जनजागृती, रुग्णवाहिका सेवा, गरजूंना मास्क, सॅनिटायझर, औषधांची उपलब्धता यासारखे विविध उपक्रम हाती घेऊन ‘सेवा परमो धर्म’ या संकल्पनेतून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवाकार्य करणाऱ्या आरोग्यम् धनसंपदा फौंडेशन अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगावच्या वतीने समाज भूषण पुरस्कार २०२१ देऊन गौरविण्यात आले. त्याना यापूर्वीही 4 आंतरराष्ट्रीय आणि १२६ राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहेत.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील तसेच प्रमुख अतिथी जेडीसीसी बँक चेअरमन मा.श्री गुलाबराव देवकर, पी ए पाटील (मराठा कुणबी वधु वर परिचय ग्रुपचे संस्थापक. अध्यक्ष ) संदीपा वाघ ( राजनंदनी फाउंडेशन अध्यक्षा ) यासह नागरिकांची उपस्थिती होती.

Protected Content