यावल येथील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक इतिहास विभागाचे प्रा. गणेश जाधव, उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील, प्रा.एम. डी. खैरनार यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागाचे डॉ. अनिल पाटील यांनी शिवछत्रपती जयंती साजरी करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संध्या सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे जगभर साजरी केली जाते. हे केवळ महाराजांचे नेतृत्व व कर्तुत्व यांचा सन्मान आहे. महाराजांची रयत विषयी जाण, परस्त्री विषयी आत्मीयता, स्वराज्याचा दूरदृष्टीकोन, राजनीती,गनिमी कावा असे अनेक पैलूंमुळे महाराजांचा इतिहास अजरामर आहे. म्हणून छत्रपतींचा जीवन आदर्श विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे प्रतिपादन अध्यक्षिय भाषणात केले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. गणेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर व धोरणांवर प्रकाश ज्योत टाकला. अठरापगड जातींना सन्मान देणारा एकमेव राजा होऊन गेला, असे त्यांनी सांगितले. यावेळी वैष्णवी माळी हिनेही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तेजश्री कोलते हिने केले तर आभार कु. हीना सोनवणे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एस.पी.कापडे, डॉ. एच.जी.भंगाळे, डॉ.आर. डी. पवार, डॉ.पी.व्ही. पावरा, प्रा.एस. टी. वसावे, प्रा. एम.पी. मोरे, प्रा. राणेआदींनी परिश्रम घेतले.

Protected Content