देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘अ..’ ठरली सर्वोत्कृष्ट फिल्म – पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

जळगाव प्रतिनिधी | डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.

यात निर्माता सुनील अहिरे आणि दिग्दर्शक शंकर प्रशोध यांच्या ‘अ…’ला सर्वोत्कृष्ट लघू चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट कॅम्पस फिल्म हा पुरस्कार निर्माता, दिग्दर्शक शेख अस्लम युनूस यांच्या ‘तासिका’ या लघू चित्रपटास तर सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार ‘Man In Manchenster Of Maharashtra’ या माहितीपटास प्राप्त झाला.

 

देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल हा महोत्सवातील इतर पुरस्कार –

 

सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रथम – ‘अ…’ | दिग्दर्शक – शंकर यशोद | निर्माता – सुनील अहिरे

सर्वोत्कृष्ट चित्रपट द्वितीय – ‘कविता’ | दिग्दर्शक – चैतन्य काबे | निर्माता – सुनील अहिरे

सर्वोत्कृष्ट चित्रपट तृतीय पुरस्कार –

‘होप वे’ – दिग्दर्शक – रावसाहेब सातव | निर्माता प्रियंका वाघमारे

उत्तेजनार्थ पुरस्कार –

‘The Power Of E (Education)’ दिग्दर्शक – मिलिंद पाटील | आणि निर्माता – शिवराज पाटील

सर्वोत्कृष्ट कॅम्पस फिल्म पुरस्कार

प्रथम – ‘तासिका’ | निर्माता, दिग्दर्शक – शेख असलम युनुस
द्वितीय – ‘जिम्मेदार नागरिक बने’ | दिग्दर्शक – रविकुमार परदेशी | निर्माता – डॉ.अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव

सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार

प्रथम पुरस्कार – ‘Man In Manchenster Of Maharashtra’ – निर्माता, दिग्दर्शक – रोहित चव्हाण
द्वितीय – ‘तेथे कर माझे जुळती’ | दिग्दर्शक – किरण सोहोळे | निर्माता – विवेकानंद प्रतिष्ठान

ॲनिमेशन क्षेत्रातील पुरस्कार

उत्तेजनार्थ – ‘अब्रू ‘ | दिग्दर्शक -पवन पाटील | निर्माता – एम.जी.महाविद्यालय, चोपडा

इतर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पटकथा – ‘कविता’ चित्रपटासाठी अमर मारुती यांना
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – ‘मधमाशी’ – विक्रम सिंग
सर्वोत्कृष्ट छायांकन – ‘मधमाशी’ – प्रल्हाद रौंदळ
सर्वोत्कृष्ट संकलन – ‘टँकर’ – अनुप धीमान
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – ‘चित्रकार’ – आर्यन पाटील
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ‘तासिका’ – जगदीश जाधव
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ‘अ…’ – वैशाली दाभाडे
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – ‘तासिका’ – शेख अस्लम युनुस

Protected Content