प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प ; डॉ. आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात दीपोत्सव

WhatsApp Image 2019 10 25 at 5.59.07 PM

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षक मंडळ, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प करुन दीपावली उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करून दिवाळी सण साजरा केला. प्रारंभी प्रमुख पाहुणे शाळेच्या कोषाध्यक्षा हेमा अमळकर, मुख्याधापिका व पालकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रम प्रमुख मोनाली देसाई यांनी फटाक्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि प्रदुषणमुक्त दिवाळी कशी साजरी करावी याबाबत सांगून दिवाळी सणाची माहिती दिली.

चिमुकल्यांनी बनविले किल्ले

विद्यालयातील बालगट आणि बाल्यगटाच्या विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, तोरण आणि पणत्या तर शिशूगटातील विद्यार्थ्यानी ग्रिटींग कार्ड, आणि किल्ला बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Protected Content