अभिजीत बिचुकलेंपेक्षा त्यांच्या पत्नीला अधिक मते

bichukale with wife

 

मुंबई प्रतिनिधी । वरळी आणि सातारा मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे अभिजीत बिचुकले यांना दोन्ही मतदारसंघातून फक्त १ हजार ५४० मते मिळाली तर, साताऱ्यातून लोकसभा पोटनिवडणूक लढवणाऱ्या बिचुकलेंच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांना १ हजार ६४५ मते मिळाली. बिचुकले यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीला १०५ मते अधिक मिळाली आहेत.

मुंबईतील वरळी मतदारसंघाच्या निकालावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघातून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्याचवेळी बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य यांना आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. वरळीत पहिल्या फेरी अखेर शून्यावर असलेल्या बिचुकलेंनी मतमोजणीत ७८१ मत मिळवली होती. तर, साताऱ्यात भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकलेंना अवघी ७५९ मतं मिळाली आहेत. अभिजीत यांच्या पत्नी अलंकृता बिचुकलेंनी साताऱ्यात माजी खाजदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत अलंकृता यांना १ हजार ६४५ मतं मिळाली आहेत.

Protected Content