नौदल जवानांच्या फेसबुक वापरावर बंदी

Indian Navy banned Facebook

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सोशल मीडियाद्वारे शत्रूच्या गुप्तचर संस्थांना माहिती पुरवण्याचे कारस्थान उघड झाल्यानंतर नौदल जवानांच्या फेसबुक वापरावर बंदी टाकण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या सात जवानांना नौदलाची संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे शत्रूच्या गुप्तचर संस्थांना पुरवताना पकडण्यात आले होते, या घटनेनंतर नौदलाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले.

नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय नौदलाकडून मेसेजिंग अ‍ॅप, नेटवर्किंग आणि ब्लॉगिंग, कंटेट शेअरिंग, होस्टिंग, ई-कॉमर्स साईट्सवर देखील बंदीची घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी २० डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या व हेरगिरी करणारे एक रॅकेट उद्धवस्त करत, यात सहभागी असल्याचे आढळलेल्या नौदलाच्या सात जवानांना अटक केली होती. आंध्रपदेश पोलिसांच्या गुप्तरच विभागाने केंद्रीय गुप्तचर संस्था व नौदलाच्या गुप्तचर विभागाच्या मदतीने ‘ऑपरेशन डॉल्फिन्स नोज’ राबवत हे रॉकेट उद्धवस्त केले होते.

Protected Content