राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,३८० वर पोहोचली

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात आज १६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १३८० वर पोहोचला आहे.

 

महाराष्ट्रात आज १६ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही १,३८० वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पुणे शहरात ११ जण नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुणे शहरातील रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे. गुरुवारी राज्यात एकूण २५ कोरोनाबाधितांचा मृत्यूची नोंद झाली. यापैकी १४ मृत्यू पुण्यातील आहेत, ९ मुंबई, मालेगाव, रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एका १०१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा ९७ वर गेला आहे. सध्या १,१४२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.

Protected Content