एसटीच्या खासगीकरणाची शक्यता : लवकरच होणार निर्णय

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतांनात यावर पर्याय म्हणून एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसतं नाहीत. त्यामुळं आता यावर पर्याय म्हणून एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा विचार सरकार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एसटी महामंडळाचे आठ अधिकारी आंध्रप्रदेश, तेलंगणाच्या अभ्यास दौर्‍यावर गेले आहेत. या राज्यांमध्ये एसटीचं खासगीकरण कशा प्रकारे करण्यात आलं आहे, याचा ते अभ्यास करणार आहेत. याद्वारे एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा म्हणून एसटी महामंडळानं सरकारमध्ये विलीनीकरणापेक्षा खाजगीकरण होऊ शकत का? यासंदर्भात महामंडळांनं समिती नियुक्त करून या समितीला अभ्यास अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, एसटीच्या शिवनेरीच्या खाजगी बस एसटी महामंडळाच्या सेवेत कार्यरत आहेत तशाच पद्धतीच्या खाजगी बस घेऊन एसटी महामंडळाचा तोटा भरून निघू शकतो का? या संदर्भात या समितीला आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये हेच खाजगीकरणाचं मॉडेल राबविण्यात आलं आहे. त्याचाही अभ्यास संबंधीत समिती करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content