शिरसोली येथे गरजूंना कीराणा साहित्यांचे वाटप ; न्यू इंग्लिश मेडियम स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील  न्यू इंग्लिश मेडियम स्कूलच्या १९९९ च्या बँचच्या माजी विद्यार्थां मित्रांकडून शिरसोली येथे गरजूंना कीराणा साहित्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

 

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींचा रोजगार बुडून त्यांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरसोली येथेही अनेकांचा रोजगार बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे. याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून जळगाव शहरातील 1999 च्या न्यू इंग्लिश मेडिएम स्कूलच्या दहावीच्या बँच मार्फत किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर मित्र व्हाटसअप ग्रुपमुळे एकत्र येऊन कीराणा साहित्य वाटप करीत आहे.

 

यावेळी आनंद पांडे,बलराम लोकवाणी,हितेश ललवाणी, अभिषेक कोरीया,अमित वर्मा, भरत भेंडवाल,भरत धारा,भरत शर्मा, चंदु सैनी,दर्शन जानी,दिपेश राजकोठीया,डॉ. मनिष सरोदे,डॉ विकास जोशी,गणेश वैद्य, गौतम लापसिया,डॉ गोपाल चव्हाण, काफिल खान,महावीर मल्हारा ,डॉ सिमा राणे, डॉ रसिका देशपांडे, निता ललवाणी, रुबी सुरतवाला,रश्मी मित्तल, इंदू सैनी,शितल आवस्थि यांच्यासह 54 मित्रांनी गरजूं लोकांना दिले. यावेळी पत्रकार भगवान सोनार, शेनफडू पाटील,राजु चौधरी,आबा सोनार,चंदु काळे, बापू मराठे, अकील मेंबर,नाना हवलदार, संजू सोनार,बबलू सोनार,भगवान पाटील, हे उपस्थित होते.

Protected Content