रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जळगाव ते भादली रेल्वेदरम्यान एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात गुरुवार ६ जुलै रोजी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव ते भादली दरम्यान असलेल्या रेल्वे खंबा क्रमांक ४३४ च्या डाऊन लाईनवर एक अनोळखी ३० वर्षे तरुणाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात जळगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक यांना माहिती मिळाली, त्यांनी या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल युनूस शेख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. दरम्यान मयत तरुण हा अंदाजे ३० वर्षे असून त्याच्याकडे ओळखीचे कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मृतदेह उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे. या घटनेप्रकरणी गुरुवार ६ जुलै रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युनोसेक करीत आहे.

Protected Content