तांबापूरातील नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी; राष्ट्रवादीची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तांबापूरा परिसरातील झोपडपट्टी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात गुरुवारी ६ जुलै रोजी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे तांबापुर परिसरातील झोपडपट्टी भागात सांडपाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी घरात शिरले, त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून त्यांची राहण्याची देखील गैरसोय झाली आहे. आदर्श नगरातील गटारीचा व सांडपाण्याचा प्रवाह तांबापुर भागात जोडल्या गेल्याने तसेच रस्त्याचे पाणीही या भागात खोलगट व झोपडपट्टीयुक्त असल्याने पाणी शिरले. त्यामुळे झोपडपट्टीधारकांचे नुकसान झाले आहे. शिवाय बेंद्रे हॉस्पिटल येथील नाल्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे, त्यामुळेही ही घटना घडली आहे. दुसरीकडे बंद झालेल्या प्रवाह हा पुरावात सुरू करण्यात यावा, तसेच नालेसफाई योग्यरीत्याने करण्यात यावी, जेणेकरून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान भविष्यात होणार नाही, याची काळजी घ्यावी, आणि नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले.  याप्रसंगी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content