गिरणानदीतून वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणा गावाजवळील गिरणा नदीपात्रातून मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई केली आहे. यावेळी ट्रॅक्टरचालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला. याप्रकरणी रात्री साडेदहा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील आव्हाणा गावाच्या नजीक असलेल्या गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरमधून वाहतूकी केली जात असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस व महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसारपथकाने मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता थेट गिरणा नदीत कारवाई केली. यावेळी अज्ञात ट्रॅक्टरचालक हा वाहन सोडून पसार झाला होता. पोलीसांनी वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी धामनगाव तलाठी रविंद्र घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक आणि मालक वैभव रविंद्र चौधरी रा. शनीपेठ, जळगाव याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content