माहितीपटाने उलगडला टोकरे कोळी समाजाचा इतिहास (व्हिडीओ)

8b51ca73 0151 4451 94fb afaf77acef1b

भुसावळ (विशेष प्रतिनिधी) जनगणना विभागाचे निवृत्त उपसंचालक व प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शामकांत शिरसाट यांच्या संकल्पनेतून प्रवर्तन बशुउद्देशिय संस्थेच्या सदस्यांनी दोन वर्षाच्या अभ्यासातून टोकरे कोळी समाजाच्या चालीरी्ती, इतिहास, संस्कृती यावर केलेल्या माहितीपटाचे प्रदर्शन नुकतेच येथे करण्यात आले.

 

यावेळी अध्यक्ष शामकांत शिरसाट व संस्थेचे सदस्य रवी कोळी यांनी स्लाईड शो व माहितीपटाद्वारे टोकरे कोळी समाजाचा इतिहास, चालीरीती, लग्नकार्यातील पुरातन विधी, पुरातन काळातील शिकारीची पध्दत याबाबत माहिती दिली. तसेच जात पडताळणी समितीकडे जाण्यासाठी फाईल कशी असावी ? याबद्दल मार्गदर्शन केले तसेच मुलाखतीची तयारीही समाज बांधवांकडून करुन घेतली. यावेळी त्यांनी शंकांचे निरसनही केले. यावेळी लखीचंद बाबीस्कर, रवी कोळी, अनिल सैंदाणे, ज्ञानेश्वर धोंडू सोनवणे रामचंद्र साळुंखे, बी.के. सोनवणेआदी उपस्थीत होते. सदर कार्यक्रमाला टोकरे कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

 

Add Comment

Protected Content