जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ११ महिन्यांनी पकडला

 

भुसावळ : प्रतिनिधी । बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ११ महिन्यांनी बाजारपेठ ठाण्याच्या शोध पथकाने आज तब्बल ११ महिन्यांनी पकडला .

हा गुन्हा गुरनं 0579/2019 भा.द.वि. कलम-394,323,504,506,34 प्रमाणे दि 21. डिसेम्बर 2019 रोजी दाखल करण्यात आला होता . फिर्यादी सागर बारगळ (26 , रा.मुंडवाडी ता.कन्नड जिल्हा औरंगाबाद) हे गावी जाण्यासाठी त्या दिवशी पहाटे 5.30 भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीकडे पायी जात असताना तीन अज्ञात इसमानी फिर्यादीजवळील 6,000 रु किंमतीचा मोबाईल व 1700 रु रोख मारहाण करून चाकुचा धाक दाखवून त्यांना जामनेर रोड हाॅटेल हेवनचे बाजुच्या गल्लीत नेऊन हिसकावून घेतले होते.
फरार आरोपी लुकमान उर्फ लुक्का शहा (26,रा.दीनदयाल नगर, भुसावळ ) हा शहरात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याना खबऱ्याकडून मिळाली होती . आरोपीस जामनेर रोडवरील प्रीमिअर हॉटेल समोरून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले
पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे ,.अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे , मंगेश गोटला ,पो.ना. किशोर महाजन, उमाकांत पाटील, पो.काॅ. विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव , प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे यांनी ही कारवाई केली

Protected Content