संगणक युगाच्या माध्यमातुन राजीव गांधी यांनीआधुनिक भारताचा पाया रचला – माजी आमदार सानंदा

WhatsApp Image 2019 05 21 at 2.29.17 PM

खामगांव (प्रतिनिधी) आज भारत देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने अग्रेसर होत आहे. माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनीच भारतामध्ये संगणक युगाचा प्रारंभ करुन खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा पाया रचला असल्याचे प्रतिपादन मा.आ. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

दि. २१ मे रोजी खामगांव येथील जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहतांना ते बोलत होते. याप्रसंगी कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, माजी नगराध्यक्षा सरस्वती खासने, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, पं.स.सदस्य मनिष देशमुख,बुलडाणा लोकसभा युवक काॅंग्रेसचे महासचिव तुषार चंदेल, अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष बबलु पठान, माजी नगरसेवक गोविंद मिश्रा आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना  सानंदा म्हणाले की, राजीव गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात  राजीव गांधी यांना विज्ञान, तंत्रज्ञान व संगणक या प्रबळ पखांनी भारत जगातील सर्वोच्च सत्तास्थानी होउ शकतो असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी १८  वर्षाच्या युवकांना मतदानाचा हक्क मिळवुन दिला. पंचायत राजच्या माध्यमातुन ग्रामीण भाग मजबुत करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. स्व. राजीव गांधी यांच्या विचारांची आज देषाला खरी गरज असुन सर्वांनी राष्ट्रहितासाठी एकसंघ होवुन कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा हीच राजीव गांधी यांना खरी श्रध्दांजली ठरेल असेही राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले. या कार्यक्रमाचे संचलन काॅंग्रेस जेष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव यांनी केलेे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सुडोकार,मनोज वानखडे,अन्सार भाई, शेख रशीद, छोटु धामेलीया, भगवान बोंबटकार,धनसिंग बिल्लारे, प्रमोद महाजन, भगवानसिंग इंगळे, गजानन बाठे, सहदेव नांगोलकार, महेश चव्हाण, कैलाश देशमुख, पप्पु पारस्कर, निवृत्ती सुरळकर, राजु हिवाळे, शेषराव भोजने, सिताराम भोपळे, अवधुत टिकार, प्रदिप आटोळे, गोवर्धन केनसकर, सारंगधर भारसाकळे, पिंटु राउत यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content