यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील आडगाव येथे 40 वर्षीय तरुण शेतमजुराची गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत यावल पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या सदर्भात पोलीसांनी दिलेली माहीती अशी की, आडगाव तालुका यावल मेथे राहणारे समाधान प्रभाकर पाटील (वय- ४०) वर्ष यांनी 21 मे रोजी आपल्या राहत्या घरात सकाळी ५ वाजेच्यापुर्वी घराच्या छताला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. मयत समाधान पाटील हा शेतमजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदर र्निवाह करीत होता. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वडील, आई, असा परिवार असुन, आत्महत्या हत्याचे कारण अद्याप मिळु शकले नसले तरी तो गेल्या काही दिवसापासुन कर्जबाजारीमुळे त्रस्त झाल्याचे कळते. या कर्जबाजारीमुळे तो व्यसनाच्या आहारी गेल्याचे देखील वृत्त आहे. समाधान प्रभाकर पाटील यांनी आत्महत्या केल्याची खबर त्याचे वडील प्रभाकर बाबुराव पाटील यांनी यावल पोलीस स्टेशन मध्ये दिल्याने आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत समाधान पाटील याचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संतोष सांगोळे यांनी केल्यावर प्रेत नांतेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरिक्षक डी.के. परदेशी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस कॉस्टेबल सुनिल तायडे हे करीत आहे.