तहसीलदारांविरुद्ध आंदोलन करणार्‍या जि. प. सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । धरणगाव तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी दुपारी धरणे आंदोलन करणार्‍या जिल्हा परिषद सदस्या माधूरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरूध्द विरुद्ध साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील गणेश कॉलनीतील रहिवासी माधुरी चंद्रशेखर अत्तरदे या सावळा-बांभोरी गटातून निवडून आल्या आहेत. जि. प. सदस्या माधूरी अत्तरदे, बांभोरीचे माजी सरपंच राकेश नन्नवरे, कविता राकेश नन्नवरे, वर्षा मनोज झोपे, नयना दीपक चौधरी, सुनिता नितीन बोरोले यांनी धरणगावकरांना न्याय देण्यासाठी यांच्यासह विविध मागण्यांसाठी तहसीलदार नितीन देवरे यांच्याविरोधात जमावबंदीचे आदेश असतांना तसेच साथरोग प्रतिबंध कायदा लागून असतांना देखील बेकायदेशीररित्या ७ मे रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी जि.प. सदस्या माधूरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरुद्ध कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोलीस विकास पहूरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र सुरवाडे करीत आहे.

Protected Content