Home धर्म-समाज दुसखेडा येथे उद्या विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन

दुसखेडा येथे उद्या विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन

0
33


 

यावल,  प्रतिनीधी ।  तालुक्यातील दुसखेडा येथील सेवानिवृत्त वरीष्ट पोलिस अधिकारी दिलीप सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिम्मत स्व.अंजली दिलीप सुर्यवंशी फाऊंडेशन संचलीत तथा गितांजली प्रतिष्ठान मार्फत दि.८ मे रोजी संपुर्ण १५००  लोकवस्तीच्या गावात आपल्या जन्मभुमीचे कर्तव्य म्हणुन कोरोना प्रादुर्भावापासुन सुरक्षीत राहण्यासाठी  आवश्यक असणारे विविध साहित्य वाटप करण्यात येणार आहे. 

स्वं.अंजली दिलीप फाँडेशन मार्फत दर वर्षी वाढदिवसानिम्मत विविध उपक्रमाव्दारे कार्यक्रम घेण्यात येतात. मात्र या वर्षी कोवीड १९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहीती सेवानिवृत्त वरीष्ट अधिकारी दिलीप सुर्यवंशी यांनी दिली.

 


Protected Content

Play sound