किशोर मेढे यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाचे माजी विक्रीकर सहआयुक्त, धनाजी नाना महाविद्यालयातील माजी प्राध्यापक तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगातील माजी सदस्य सचिव किशोर मेढे यांची महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या सदस्यपदी(सामाजिक व आर्थिक) शासनाने नियुक्ती केली आहे.

 

किशोर मेढे हे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील रहिवासी असून त्यांचे अस्तित्वाचे आकाश (कवितासंग्रह) दर्पण(गुलजार,जावेद अख्तर,निर्मला पुतुल, ल्हासंग, सिरिंग यांच्या हिंदी/इंग्रजी कवितांचा मराठी अनुवाद), उत्सव सुरूच आहे (इमरोज यांच्या जस्न जारी है या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद), उगवेल का कधी अशी एखादी पहाट( तिबेटी इंग्रजी कवितांचा मराठी अनुवाद), बोस्कीचा जंगल नामा (गीतकार गुलजारांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद), सगे सारे ( गीतकार गुलजार यांच्या कवितांचा मराठी अनुवाद) दलित भारत मधील अग्रलेख या पुस्तकाचे संपादन त्यांनी केलेले आहे.

Protected Content