उभ्या कंटेनरला लागलेल्या आगीत फ्रीज जळून खाक (व्हिडिओ)

जळगाव- – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जुने प्रताप हॉटेल मागील रेल्वे मालधक्का येथे उभा असलेल्या मालवाहू कंटेनेरला अचानक आग लागली सायंकाळी ५ ते ५.१५ वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी शर्तीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली.

 

याबाबतची हकीकत अशी की, हॉटेल द्वारका जवळील जुना मालधक्का येथे फ्रीज असलेला एमएच १९ सीवाय २५११नंबरचा कंटेनर उभा होता. यातून अचानक धूर निघू लागल्याने S K Tran line चे सुपरवायझर निलेश महाजन यांनी अग्निशमन दलास मोबाईलने कळविले असता अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी पोहचले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली आहे. यात फ्रीज जळून खाक झाले आहेत. हे फ्रीज रांजणगाव (पुणे) येथून रेल्वेद्वारा गुवाहाटी व कोलकत्ता येथे पाठविण्यात येणार होते. दरम्यान, मालधक्क्यावर फ्रीज असलेला एमएच १९ सीवाय  २५११नंबरचा कंटेनर उभा होता. मात्र, यातून अचानक धूर निघू लागल्याने शेजारील कर्मचारी व हमाल यांनी या कंटेनरकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी ही आग सुमारे एक तासात आटोक्यात आणली. यात ६४  नवीन फ्रीज पैकी २७ जळालेले  असून ३७ फ्रीज  वाचविण्यात अग्निशमन दलाच्या यश आले.  आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाचे  वाहन चालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी,परमेश्वर कोळी,भगवान पाटील,नितीन बारी,वसंत कोळी,वाहन चालक प्रदीप धनगर,जगदीश साळुंखे आणि होमगार्ड कर्मचारी अनिल पाटील यांनी प्रयत्न केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/433242444803644

 

Protected Content