चंद्रकांत पाटलांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत कारवाईची मागणी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ओबीसी समाजाच्या आरक्षण मोर्चाप्रसंगी भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून जाहीर निषेध नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी शनिवार, २८ मे रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी भारतीय जनता पक्षाने बुधवार, २५ मे रोजी मंत्रालयावर मोर्चा काढला. या मोर्चेत पक्षाचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या विषयी “तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा , दिल्लीला जा अन्यथा मसणात जा’ असे वादग्रस्त विधान केला. यामुळे समस्त महिला वर्गाचा अपमान झाला असून चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे शनिवार, २८ मे रोजी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात आजच्या स्त्री ह्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून कामगिरी करत आहे. आणि त्यांच्याच बाबत खालच्या स्तरावरील विधान करून चंद्रकांत पाटील यांनी महिलेचा अपमान केला आहे. यामुळे तात्काळ पाटीलांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठिकठिकाणाहून करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, शहराध्यक्ष शाम देशमुख, शशिकांत साळुंखे, भगवानसिंग अमरसिंग, रामचंद्र जाधव, मोहित भोसले, दीपक पाटील, निखिल देशमुख, प्रकाश पाटील, प्रवीण जाधव, मंगेश तावडे, भाऊसाहेब पाटील, सुरज शर्मा, कुणाल पाटील दुर्गेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content