जीणमाता सेवा समीतीतर्फे गरबा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गणेश उत्सव साजरा झाल्यानंतर सर्वत्र दुर्गाउत्सवाची तयारी सुरू झाली. यात प्रामुख्याने युवती व महिलांसाठी आकर्षण असते ते म्हणजे गरबा, दांडिया साधारण १२-१५ दिवसापासून सराव करण्यास सुरुवात केली जाते.

या अनुषंगाने जि माता सेवा समितीच्या पुढाकाराने गरबा – दांडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर जीणमाता मंदिर, संकट मोचन हनुमान मंदिर, रेल्वे गेट जवळ ,खामगाव येथे दररोज दुपारी ४ ते ६ या वेळेत 25 सप्टेंबर पर्यंत होईल. प्रशिक्षणाच्या कालावधीत विविध गरबा, दांडियांच्या विविध स्टेप्स शिकविण्यात येणार आहेत.

तसेच प्रशिक्षण शिबिरामध्ये विभिन्न प्रशिक्षक द्वारा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे शिबिरात फक्त महिला व मुली सहभागी होऊ शकणार आहेत तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी गोविंद चुडीवाले 9422118678 यांच्याशी संपर्क साधावा. असे आव्हान आयोजका द्वारे करण्यात आले आहे. अशी माहिती पियूष अग्रवाल यांनी दिली आहे .

Protected Content