मेहरूण तलावात वृध्द महिलेचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण तलावातील गणेश घाटजवळील पाण्यात आदर्श नगरातील ६८ वर्षीय महिलेचा मृतदेह गुरूवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

सुमती रमेश श्रीखंडे (वय-६८) रा. आदर्श नगर, जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमती सुर्यवंशी ह्या वयोवृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील मेहरूण तलाव येथील गणेश घाटजवळ त्यांचा मयत स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली किंवा पाण्यात पडले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली आहे. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, १ मुलगी असा परिवार आहे.

Protected Content