गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाची रोपवाटीकेला भेट

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । आता पावसाची रिमझिम सुरू झाली असून प्रत्येकाला वृक्ष लागवड व संवर्धनाची माहिती व्हावी या उद्दिष्टाने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाच्या इयत्ता 3 री व 4 थी च्या वर्गाची क्षेत्रभेट अनिल नर्सरी रोपवाटिका रामानंद नगर येथे आयोजित करण्यात आली.

 

रिमझिम पावसाचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी गुलाब ,जाई,जुई ,चमेली ,जास्वंदी कमळ यासारखी फुलझाडे , आंबा ,पेरू , चिकू ,डाळींब , मोसंबी , पपई सारखी फळझाडे ,शोभेची रोपे , विविध औषधी वनस्पतींची रोपे तसेच लहान पासून तर मोठ्या वृक्षपर्यंतची माहिती विद्यार्थ्यांनी या वेळी घेतली तर लाजाळू झाडाच्या पानांना हात लावून ते झाड आपली पाने कशा प्रकारे मिटून घेते याचे प्रात्यक्षिक ही त्यानी यावेळी बघितले व अनुभव घेतला.

 

वृक्ष वाटिकेच्या सुशोभित वातावरणाने विद्यार्थ्यांची मने अगदी आकर्षित झाली तर रोपे लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कुंड्यांचीही माहिती त्यांनी यावेळी शिक्षकांकडून जाणून घेतली. सर्वांनी किमान एकतरी झाड लावून त्याचा संवर्धन करण्याचा संकल्प या वेळी घेतला.कोणत्या झाडापासून आपणास काय मिळते याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

 

क्षेत्रभेटीचे आयोजन तसेच रोपवाटिकेतील सर्व रोपांचे मार्गदर्शन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी नर्सरीच्या व्यवस्थापकांच्या मदतीने केले तर उपशिक्षिका कल्पना पाटील , गायत्री पवार यांनी विशेष सहकार्य केले प्रसंगी शाळेच्या मुख्या.धनश्री फालक , रोपवाटिकेचे प्रमुख अनिल यादव तसेच पालक उपस्थित होते.

Protected Content